आयपीएल 2023 सुरू होण्यास आता काही दिवसच राहिले आहेत. येत्या 31 मार्च रोजी आयपीएलचा बिगुल वाजणार आहे. यंदाच्या मोसमातील पहिला सामना गुजरात जाएंटस विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान होणार आहे. उद्घाटनाचा पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएल उद्घाटनाचा रंगारंग कार्यक्रम होणार असून अनेक सेलिब्रेटी थिरकणार आहेत.
वृत्तानुसार, बॉलीवूड सुपरस्टार कतरिना कैफ, टायगर श्रॉफ, गायक अरिजित सिंग या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात रंगत वाढवतील. याशिवाय दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार रश्मिका मंदान्ना आणि तमन्ना भाटियाही त्यांना चांगली साथ देतील.आयपीएलचा पहिला सामना हा गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये होणार आहे. हा सामना रात्री ७.३० वाजता सुरु होईल. पण त्यापूर्वी ही ओपनिंग सेरेमनी होणार आहे.गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा होणार आहे. सायंकाळी दीड वाजल्यापासून ते सुरू होऊ शकते, असे मानले जाते. हे सुमारे ४५ मिनिटे चालेल. आयपीएलचा पहिला सामना संध्याकाळी ७.३० पासून खेळवला जाईल.
