राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यांवर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गिरीश बापट आजारी आहेत. आपल्या तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आजही पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा दबदबा आहे. यामुळेच नुकत्याच झालेल्या पुणे कसबा पेठ पोटनिवडणुकीत त्यांना व्हिलचेअरवर बसवून प्रचाराच्या मैदानात उतरले होते.
अद्याप अधिकृत माहिती हाती आली नाही. पुण्यातील मंगेशकर रूग्णालयाकडून तासाभरात मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर बापट यांच्या आरोग्याविषयी अधिकची माहिती मिळू शकेल.
