पाकिस्तान वर्ल्डकपमधील लढती भारतात खेळण्याची शक्यता कमी

सप्टेंबर 2023 मध्ये होणारी आशिया चषक भारत-पाकिस्तान हा सामना कोणत्या शहरात होणाक याबाबत संभ्रम कायम आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत आमने-सामने येतात. आशिया कपच्या आयोजनावरुन गेल्या सहा महिन्यांपासून वाद सुरू होता. आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, अशी भूमिका बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट समितीचे अध्यक्ष जय शाह यांनी घेतली होती. तर भारतीय संघ पाकिस्तानात आली नाही, तर आम्हीही आगामी एकदिवसीय वर्ल्डकपसाठी भारतात जाणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली होती. मात्र यावर पाकिस्तान आणि बीसीसीआय या दोन्ही क्रिकेट बोर्डाचे एकमत झाल्याचे समजतंय.

संपूर्ण आशिया कप स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर तटस्थ ठिकाणी होणार आहे. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबतही असेच काही अहवाल येत आहेत. नुकताच एक रिपोर्ट समोर आला होता. ज्यामध्ये पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. तर पाकिस्तान संघ विश्वचषकातील आपले सर्व सामने तटस्थ ठिकाणी म्हणजेच बांगलादेशमध्ये खेळणार आहे.भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानच्या लढती इतर देशात खेळणे शक्य आहे, असे विधान आयसीसीचे क्रिकेट व्यवस्थापक वसिम खान यांनी केले आहे. पाकमधील आशिया करंडक स्पर्धेबाबत भारताच्या भूमिकेला त्याचप्रमाणे उत्तर दिले जाऊ शकते असेही ते म्हणाले.