देशातील कोरोनाचा संसर्गदिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. देशात आज 3016 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. सोमवारी हा आकडा 1573 इतका होता. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. मंगळवारी देशात 2 हजार 151 कोरोनाबाधित सापडले होते. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढून 2.73 टक्के झालं आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील 11 राज्यांमध्ये XBB.1.16 प्रकाराची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या प्रकारातील प्रकरणांची संख्या 600 च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये XBB प्रकारांची अधिक प्रकरणे येत आहेत. या प्रकारामुळे मृत्यूही होत आहेत. या प्रकाराची वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व राज्यांना जीनोम सिक्वेंन्सिंग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.हाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात या व्हेरियंटचा संसर्ग झालेले रुग्ण अधिक आहेत.
करोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग झाल्याने मृत्यूही होत आहेत. तामिळनाडूत या व्हेरियंटचा संसर्ग झाल्यामुळे एका २७ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. या व्हेरियंटने बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना जीनोम सीक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.
