मुंबई – गोवा महामार्ग कामाची डेडलाईन जाहीर, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

तब्बल 12 वर्षे रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खारपाडा टोलनाका इथं झाले. यावेळी गडकरी यांनी मोठी घोषणा केली. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर महिना अखेर संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल, असे गडकरी यांनी जाहीर केले.

मुंबई- गोवा महामार्गाविषयी मात्र मी दुःखी आहे. १० हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली होती. या रस्त्याच्या कामानंतर पर्यावरणाच्या दृष्टीने फायदा होणार आहे, असे यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितल आहे. दरम्यान, गेल्यावर्षी इंदापूर ते कासू दरम्यानच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. अजून देखील त्या कामाला सुरुवात झाली नाही. यामुळे कोकणवासीयांमध्ये नाराजीचा असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्यावर्षी इंदापूर ते कासू दरम्यानच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं होते. अजूनही त्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान आजच्या भूमिपूजनामुळे कामाला गती येईल असा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केलाय.