भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अफगाणिस्तानातून येऊन भारताकडून क्रिकेट खेळणारे दिग्गज क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. 2 एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचं निधन झालं आहे. सलीम दुर्राणी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते, ज्यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. भारतीय संघासाठी, त्यांनी एकूण 29 कसोटी सामने खेळले आणि त्यात 1202 धावा केल्या. या 1202 धावांमध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या आहेत.
अफगाणिस्तानमधील कबूल येथे जन्मलेले दुराणी प्रथम कराची आणि नंतर भारतात आले. दुराणी आठ महिन्याचे होते तेव्हा त्यांचे कुटुंबीय कराचीला आले. त्यानंतर भारताची फाळणी झाली तेव्हा ते भारतात आले. ६०-७०च्या दशकात दुराणी यांनी अष्ठपैलू म्हणून वेगळी ओळख निर्माण केले. भारतीय संघातील एक शानदार अष्ठपैलू असा त्यांचा उल्लेख केला जातो. १९६०च्या दशकात दुराणी यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले ते पहिले क्रिकेटपटू होते.
1960मध्ये त्यांनी भारताकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 29 कसोटी सामने खेळले. 29 कसोटीतील 50 डावांमध्ये त्यांनी 1202 धाव ठोकल्या. तर 75 बळी घेतले. यात त्यांच्या एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. 1962मध्ये त्यांनी इंग्लंडच्या विरोधात पार पडलेल्या चेन्नई कसोटीत 177 धावांवर 10 विकेट काढले होते. त्यांच्या टेस्ट करिअरमधील ही सर्वोत्तम गोलंदाजी होती.
