नवी दिल्ली : टीका करण्यासाठी मुद्दे संपल्यावर तोल तोडण्याचे उदाहरण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत घडले. आरएसएसच्या अनुषंगाने सावरकरांवर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीला हात घातला आणि स्वतःचं ट्रोल झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे दाढीवाल्यांच्या विरोधात होते, असे अजब वक्तव्य संजय राऊत यांनी केले. ते म्हणाले, सावरकरांची गौरव यात्रा काढत आहेत, त्यांना सावरकरांविषयी काही माहिती तरी आहे का? सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारधारेत काहीही संबंध नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही सावरकरांचा हिंदुत्ववाद मानला नाही.
सावरकर दाढीवाल्यांच्या विरोधात होते, मग एकनाथ शिंदे आता दाढी कापून फिरणार का? संजय राऊत यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांच्यावर त्यांच्या टीका करायची होती. पण वैचारिक मुद्दा मांडण्याऐवजी त्यांनी दाढीचा मुद्दा मांडला.त्यानंतर लोकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे दाढीवाले फोटो टाकून संजय राऊत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
