ऋषी सिंहने जिंकले इंडियन आयडॉल 13 चं विजेतेपद; मिळाले 25 लाख आणि आलिशान कार

इंडियन आयडल १३ चा महाअंतिम सोहळा काल पार पडला. अयोध्याचा ऋषी सिंग या पर्वाचा विजेता ठरला. ७ महिने चाललेल्या या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. त्या सर्वांनी ऋषीचे कौतुक केले होते. इंडियन आयडल १३ चा विजेता ऋषी सिंगल ट्रॉफयसहा २५ लाख आणि ब्रँड न्यू ब्रेझ्झा ही कार मिळाली आहे.देबोस्मिता रॉय ही उपविजेता ठरली. ऋषी आणि देबोस्मिता व्यतिरिक्त टॉप ६ मध्ये सोनाक्षी कर, चिराग कोटवाल, शिवम सिंह, बिदीपता चक्रवर्ती हे स्पर्धक होते. ऋषीने ऑडिशनलाच परीक्षकांना इम्प्रेस केले आहे. ऋषी क्रेझ इतकी आहे होती की, विराट कोहली देखील त्याचा फॅन झाला आणि त्याला फॉलो करू लागला.

इंडियन आयडॉल 13 च्या टॉप 6 फायनलिस्टमध्ये ऋषी याच्यासह शिवम शाह, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, देबस्मिता रॉय आणि सोनाश्री कर यांचा समावेश होता. मात्र लाईव्ह वोटिंगच्या आधारावर स्पर्धेतील विजेता ठरणार होता. यामुळे ऋषी सिंह याला जनतेचे सर्वाधिक वोट मिळाले. यासह ऋषीने इंडियन आयडल 13 चा विजेता होण्याचा बहुमान मिळवला. तर देबोस्मिता राय प्रथम उपविजेते आणि चिराग कोतवाल द्वितीय उपविजेते ठरले.

अयोध्येत राहणारा ऋषी सिंह ‘इंडियन आयडॉल 13’मध्ये सहभागी होण्याआधी मंदिरांमध्ये आणि गुरुद्वारामध्ये गाणं गात असे. त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड आहे. आता ‘इंडियन आयडॉल 13’चा विजेता झाल्यानंतर ऋषी म्हणाला,”इंडियन आयडॉल 13’ चा मी विजेता झालो आहे यावर माझा विश्वास बसत नाही. हे सगळं मला स्वप्नवत वाटत आहे. ऋषी सिंह विजेता झाला असला तर देबिस्मिताने दुसरा आणि चिरागने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांना ट्रॉफीसह पाच लाख रुपयांचा चेक मिळाला आहे.