देवेंद्र फडणवीसांनी स्वभाव बदलला तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात राहणं मुश्किल होईल – चंद्रशेखर बावनकुळे

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या पध्दतीने सांभाळलं ते देवेंद्र फडणवीस काढत नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी स्वभाव बदलला तर महाराष्ट्रात राहणं मुश्किल होईल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

ठाण्यात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावरून ठाकरेंवर हल्लाबोल चढविताना बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी स्वभाव बदलला आणि विषय काढणं सुरू केलं तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात राहणं मुश्किल होऊन जाईल, इतकी सामुग्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. काय कर्तृत्व आहे तुमचं? मुख्यमंत्री म्हणून तुम्ही सर्वस्वी फेल झाले आहात. जनाची नाही तर मनाची ठेवा. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पाच वर्ष तुमचा लाड पोसला.

माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाईट वाटतं, पण मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या पध्दतीने मानसन्मान दिला, त्यांना सांभाळलं, भावापेक्षा देखील जास्त प्रेम उद्धव ठाकरेंना दिलं. एखाद्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांचं काम बाजूला केलं, पण उद्धव ठाकरेंनी सांगीतलेली एक-एक गोष्ट त्यांनी पूर्ण केली आणि हा घरकोंबडा, बेईमान.. देवेंद्रजींना बेईमान म्हणतोय असे चंद्रशेअर बावनकुळे म्हणाले.उद्धवजी पाच वर्ष आठवा तुम्ही देवेंद्रजींकडून काय काय करून घेतलं. तुमचा इंटरेस्ट होता त्या सर्व गोष्टी तुम्ही त्यांना सांगितल्या. देवेंद्रजी बोलायला लागले तर तुमचं घरातून बाहेर पडण मुश्किल होईल, पण त्यांचा स्वभाव नाहीये तसा असेही बावनकुळे म्हणाले.