महाराष्ट्रात तुम्हाला मिस्टर फुके म्हणून ओळखतील, राम कदम यांचा ठाकरे गटाला टोला

मुंबई : आकाशाकडे पाहून सूर्यावर थूकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी स्वतःच्या चेहऱ्यावर पडते अशी गत आहे उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांची झाली असल्याचा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी लगावला आहे.
कदम म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण महाराष्ट्र देवमाणूस म्हणून पाहतो. त्यांच्या बद्दल बोलण्यापूर्वी स्वतःची लायकी, स्वतःची अवकात काय ? महाराष्ट्रामध्ये तुमची झालेली प्रतिमा याबाबत विचार करावा. संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला कंटाळला आला आहे. स्वतःचा पक्ष बुडवला आणि स्वतःच वर्तमानपत्र देखील बुडवायला निघाले आहेत. तुमच्या बोलण्यात काहीही अर्थ नाही. बाता फुंकण्याचा तुमचा धंदा आहे त्याच्यामुळे इथून पुढे महाराष्ट्रात तुम्हाला मिस्टर फुके असं म्हणून ओळखतील.