रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी अखेर पोलीस आयुक्तांचा अहवाल सादर; महिला आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

ठाण्यातील रोशनी शिंदे या महिलेला मारहाण झाल्यानंतर त्याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. या घटनेनंतर ठाकरे गटाने ठाण्यात मोठा मोर्चा काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर रोशनी शिंदे यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता त्यात महिला आयोगाने उडी घेतली आहे. महिला आयोगाने या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आयुक्त ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले. त्यानंतर ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन अहवाल सादर केला. त्यामुळे आता हा अहवाल पाहून महिला आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता त्यात महिला आयोगाने उडी घेतली आहे. महिला आयोगाने या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आयुक्त ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानंतर ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन अहवाल सादर केला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे आदेश दिले आहेत. फेसबुकवरती पोस्ट केल्याचा राग धरून रोशनी शिंदे यांच्यावर जमावाने प्राणघातक हल्ला करून मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे.

या घटनेनंतर ठाकरे गटाकडून पोलीस आयुक्तालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकार आणि पोलिसांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल ठाण्यात जनआक्रोश मोर्चा पार पडला. यावेळी माजी मंत्री अनिल परब, विनायक घोसाळकर, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित होते.