सुषमा अंधारे आणि राखी सावंत बहिणी बहिणी – मोहित कंभोज

सुषमा अंधारे आणि राखी सावंत बहिणी बहिणी आहेत. सनसनाटी पसरविण्यात त्यांची स्पर्धा असल्याची कडवट टीका भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंभोज यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर सनसनाटी लिहायचे. सभांमधून नक्कल करायची. फिल्मी भाषेत टीका करायची, यामुळे त्या चांगल्याच प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल करून नेत्यांची बदनामी केली जात आहे. याच अनुषंगाने टीका करताना कंभोज यांनी म्हटले आहे की, सुषमा अंधारे आणि राखी सावंत बहिणी बहिणी आहेत.एक बहिण महाराष्ट्राच्या राजकरणात आहे. दुसरी महाराष्ट्रातील सिनेमात आहे. रोज जास्तीत जास्त सनसनी वक्तव्ये कोण करेल अशी त्यांच्यात स्पर्धा सुरू असते.