आज हनुमान जयंती आहे, राज्यभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. पुन्हा एकदा हनुमान चालीसावरून नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे स्व:ताचा पक्ष सांभाळू शकले नाहीत, पक्षाची विचारधारा सांभाळू शकले नाहीत, आज बाळासाहेब ठाकरे देखील आश्रू ढाळत असतील असा जोरदार टोला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
नवनीत राणा म्हणाल्या की, लढणं म्हणजे काय हे बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं. उद्धव ठाकरे अत्याचारी मुख्यमंत्री होते. मुलं विचारायची आई तु कुठला गुन्हा केलास. जेलमध्ये टाकूनही मला तोडू शकले नाही. असे नवनीत राणा म्हणाले.तसेच त्या म्हणाल्या की, तसेच जिथे जिथे मविआची सभा होईल, तिथे-तिथे हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे पक्ष, विचारधारा सांभाळू शकले नाहीत, आज बाळासाहेब ठाकरे देखील अश्रू ढाळत असतील. असे म्हणत नवनीत राणा यांनी हल्लाबोल केला आहे.
नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त आणि हनुमान जयंती निमित्त सामूहिक हनुमान चालिसेचं पठण करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर नवनीत राणा यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केलं. यावेळी जेलमधील आठवणी सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.गेल्या वर्षी नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठण प्रकरणी ठाकरे सरकारने जेलमध्ये टाकलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थाना बाहेर हनुमान चालीसा पठन करण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. तब्बल 14 दिवस त्यांना जेलमध्ये राहावं लागलं होतं.
