डॉ. आंबेडकरांचा पराभव, सावरकरांचा द्वेष, दलित उद्धाराला काँग्रेसचा विरोधच

देशातील दलितांचे उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर असोत की देशात समानता आणि समरसता प्रस्तापित व्हावी यासाठी अखंडपणे कार्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर दोघांनाही काँग्रेसने विरोध गेला. डॉ. आंबेडकरांचा तर निवडणुकीत पराभव केला आणि सावरकरांचा आयुष्यभर अस्पृश्य मानले. विविध ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो लावून काँग्रेस पक्ष आमची परंपरा आणि बाबासाहेबांची परंपरा एकच असल्याचे सांगत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारा बाबत नेहमीच बोलले जाते. मात्र काँग्रेस पक्षानेच बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला होता हा इतिहास दलीत समाज कधी विसरू शकणार नाही.


कॉंग्रेसने नेहमीच गांधी विरुद्ध आंबेडकर अशी भूमिका घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समोर यांच्यापेक्षा काँग्रेसने गांधींजीना मोठे करण्याचा प्रयत्न केला. गांधीजींचे स्वप्न होते जवाहरलाल नेहरू पंतप्रधान व्हावे. गांधीजींच्या स्वप्नाप्रमाणे नेहरू हे पंत्रप्रधान झाले. पुढे मग इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी ही सर्व मंडळी या माध्यमातून पुढे आली. यातून काँग्रेस पक्षात घराणेशाहीला फोफावली. जर त्यावेळी सावरकर आणि आंबेडकर यांना पुढे केले असते तर देशात काही वेगळे चित्र राहिले असते.

समानता आणि समरसता या संबंधित बाबासाहेब आणि सावरकरांचे विचार समान होते. सावरकरांचे असे विचार होते की, या देशात अस्पृश्यता नावाचा शब्द नको राहायला. यासाठी १९२९ मध्ये सावरकरांनी कोकणातील मालवण येथे एक संमेलन देखील घेतले होते. त्या संमेलनाचे नाव ‘माजी अस्पृश्य संमेलन’ असे होते. त्यात त्यांचा उद्देश असा होता की यापुढे अस्पृश्य हे अस्पृश्य नाही राहणार. त्यावेळी त्यांनी संमेलनात वेदोक्त मंत्राने सर्वांचे स्वागत केले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की वेद हे केवळ ब्राह्मणासाठी नाही. वेद हे सर्वांसाठी आहे. असे सावरकर म्हणत असे.


माझ्या प्रेताला ब्राम्हण, मराठा, महार, डोंब अशा सर्व हिंदू बंधूंनी खांदा देऊन अस्पृश्यता आणि जातिभेद मेला असे दाखवले तरच माझा आत्मा सुख पावेल,’ असे म्हणणार्‍या सावरकरांनी या सर्व हिंदू बंधूंना एकत्र आणण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांना हरिजनही म्हणू नका, असे ते सांगत असत. ते स्वत: कोणाच्याही हातचे चहा-पाणी पीत असत, पण बरोबर असणार्‍यासही त्याच अटीवर त्यांच्या बरोबर येण्याची मुभा असे. त्यांच्याबरोबर पंगतीला बसतानाही हाच नियम असे. त्या वेळी जिल्ह्यातील शाळांतून अस्पृश्य मुलांसाठी वेगळी जागा ठेवलेली असे. याविरुद्ध सावरकरांनी वृत्तपत्रातून, सभांतून प्रभावी प्रचार केला.
अस्पृश्य विद्यार्थ्यांना सवर्ण हिंदू मुलांबरोबर बसून शिक्षण घेण्याचा न्याय्य, मानवी, नागरी आणि वैध अधिकार नाकारला जात असल्याबद्दल त्यांनी आवाज उठवला. जिल्हाधिकार्‍यांकडे तसे निवेदन पाठवले. या त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि जिल्हाधिकार्‍यांनी सर्व मुलांना सरमिसळ बसवण्याचा आदेश जारी केला, ही सावरकरांची विचारप्रणाली होती.

डॉ.आंबेडकर म्हणायचे प्राण्यांच्या मुत्राने व्यक्ती पवित्र होतो. मात्र, माणसाच्या स्पर्शाने तो अपवित्र होतो.अशी संस्कृती त्यांना मान्य नव्हती. सावरकर देखील याच पद्धतीने समांतर विचार व्यक्त करतात. ते म्हणतात, केवळ वेळेची गरज आहे म्हणून नाही तर खऱ्या धर्माची आज्ञा समजून अस्पृश्यतेचा निषेध करायला पाहिजे. त्याचे समूळ उच्चाटन करायला पाहिजे. मानवताची सेवा करणारे सर्व सनातनी हिंदूंनी हे समजायला पाहिजे. अस्पृश्यता आणि प्राणी-पशूंच्या बाबतीत सावरकरांचे आणि आंबेडकरांचे विचार बहुतांशी समान आहेत. हीच काँग्रेस पक्षाची कोंडी आहे. त्यांना हाच विचार त्रास देतो म्हणून ते सावरकरांचा द्वेष करायला लागतात.

सावरकरांना नेहमीच यांनी लांब ठेवले. सावरकरांबाबत विवाद निर्माण होईल अशी वक्तव्य जाणीवपूर्वक केली गेली. एवढंच नाही तर काँग्रेसचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे सावरकरांच्या बाबत चांगले विचार होते. तर त्यांना देखील बदलण्यासाठी काँग्रेस पक्षाने परावृत्त केले. जसे आंबेडकरांना दलितांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच पद्धतीने सावरकरांना देखील ब्राह्मणापर्यंत सीमित ठेवण्याचे षडयंत्र काँग्रेस पक्षाकडून केले जातेय. यामुळे काँग्रेस पक्षाला त्यांच्यातील घराणेशाहीतील नेत्यांना फायदा होणार आहे. या कारणामुळे सावरकरांची बदनामी काँग्रेस पक्ष करत आला आहे.