खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमान चालीसाचं पठण केलं. यावेळी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली. उद्धव ठाकरे किस खेत की मुली हैं, असा उल्लेख नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावरही टीका केली. आगामी निवडणुकीत नवनीत राणा यांना दाखवून देऊ की किस खेत की मुली. यावर खासदार नवनीत राणा यांनी प्रत्यूतर दिलंय.
नवनीत राणांनी “उद्धव ठाकरे किस खेत की मूली है”, असा प्रश्न हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीत आयोजित कार्यक्रमात बोलताना केला होता. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका करताना “निवडणुकांमध्ये कळेल किस खेत की मुली है”, असं प्रत्युत्तर दिलं. यावरून आता दोघांमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. नवनीत राणांनी टीव्ही ९ शी बोलताना संजय राऊतांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, संजय राऊत हे माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत. संजय दादा आपण किती निवडणुका निवडून आले? संजय राऊत यांना साधा कार्यकर्तासुद्धा निवडणुकीत हरवू शकतो. एखाद्या साधा कार्यकर्ता जो मातीशी जुळून आहे, तोसुद्धा संजय राऊत यांना निवडणुकीत पराभूत करू शकतो. नेत्याला जुळण्यापेक्षा मातीशी जुळणारा व्यक्ती संजय राऊत यांना निवडणुकीत नक्कीच हरवू शकतो.
