देशात कोरोनाचा धोका वाढला; 6 हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 6,050 कोविड रुग्ण आढळले आहेत. यानंतर सक्रिय प्रकरणांची संख्या 28 हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच मुंबईत 2 दोनशे 276 रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा 700 च्या वर गेला आहे. देशातल्या कोरोना रुग्णवाढीमुळे केंद्र सरकार सतर्क झालंय. डॉ. मनसूख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली देशातल्या सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देशातल्या राज्यनिहाय कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच राज्यांना खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दिल्लीत 7 महिन्यांनंतर पहिल्यांदा 700 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातही 7 महिन्यांनंतर कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 6 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत देशात 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढायला लागलीय. सध्या मुंबईत शहर, उपनगरात 6 हजार 988 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. याशिवाय शहरात १ हजार 367 सक्रीय रूग्णांपैकी ९२ टक्के रूग्णांना लक्षणं नाहीत. सध्या मुंबईत 5 रुग्णांची स्थिती गंभीर आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात शुक्रवारी 926 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तीन रूग्णांचा मृत्यू झालाय. राज्यात सध्या 4 हजारांहून अधिक रूग्णांवर उपचार सुरू आहेत.