मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांना निलेश राणे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. 11 महिने गरोदर असलेला पुरुष दिसतो हा भास्कर, असा जोरदार टोला राणे यांनी लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे, मात्र दिसतात वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे, अशी अत्यंत हीन टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली. यावर उत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे म्हणाले, ठाकरे गटाचा आमदार भास्कर जाधव हा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा कोणावरीही भुंकत असतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असताना पवार साहेबांनी याला सर्वात कमी काळ अध्यक्ष ठेवला कारण हा भलतंच काहीतरी बोलत बसायचा. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खालच्या पातळीची टीका याने केली, कोण कसा दिसतो हे सोडून दे भास्कर जाधव तू स्वतःला सलमान खान समजतो काय, 11 महिने गरोदर असलेला पुरुष दिसतो हा भास्कर. भास्कर जाधव यांनी यापूर्वी अनेकदा आक्षेपार्ह विधाने केली होती. सभागृहात शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.
