छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेला नाना पटोले गैरहजर होते. त्यामुळे मविआमध्ये सगळं काही अलबेल नाही, अशा चर्चा सुरू होत्या. आता आज होणाऱ्या नागपूरच्या सभेत अशोक चव्हाण अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
आता आघाडीची दुसरी सभा नागपुरात होत आहेत. या सभेची जोरात तयारी झाली आहे. पण, या सभेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अनुपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरू असल्याने नागपूर येथील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. आघाडीच्या प्रमुख नेत्यांना याबाबत पूर्वकल्पना दिली आहे, असे टि्वटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीत सगळं काही आॅल इज वेल नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सभेला नाना पटोले यांनी दांडी मारली होती, तर आता नागपूरातल्या सभेला अशोक चव्हाण जाणार नाहीयेत. यामुळे पटोले-चव्हाण यांच्यातील बेबनावाची चर्चा

