अखेर अर्जुन तेंडुलकरच आयपीएलमध्ये पदार्पण, मुंबई इंडियन्सने दिली संधी

वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट राडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र आजच्या सामन्यात अखेर अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सकडून आज अर्जुन डेब्यू करणार असून चाहत्यांची इच्छा अखेर आज पूर्ण होणार आहे. आजच्या मॅचमध्ये अर्जुनचा खेळ पाहण्यासाठी चाहतेही प्रचंड उत्सुक आहेत.

मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आधीच या सामन्यातून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चर 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध संघाचा पहिला सामना खेळला होता परंतु दुखण्यामुळे तो त्यानंतरच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या संघात जोफ्रा आर्चरच्या जागी अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली आहे. अर्षद खान याच्या जागेवर त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे.

अर्जुनचा यंदाच्या लिलावात मुंबई संघाने 30 लाख रुपयांना आपल्या संघात समावेश केला होता. मात्र प्रत्येक वेळेप्रमाणे हा खेळाडू पुन्हा एकदा पहिल्या संधीची वाट पाहत होता. IPL 2018 च्या मेगा लिलावात मुंबई संघाने प्रथम अर्जुनचा आपल्या संघात समावेश केला होता, परंतु आजपर्यंत या खेळाडूला एकही IPL सामना खेळता आलेला नाही. गेल्या मोसमात मुंबईचा संघ दुखापती आणि खेळाडूंना वगळण्यात सतत झगडत होता. तरीही रोहित शर्माने अर्जुनला संधी दिली नाही.