आजही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. आजही राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यासह मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता जाणवत आहे.

दरम्यान, कोकणातील ४ आणि विदर्भातील ११ अश्या एकूण १५ जिल्ह्यात आज आणि उद्या वातावरण निवळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील १०, मराठवाड्यातील ८ अशा एकूण १८ जिल्ह्यात रविवार पर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता आहे.

मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी होणारा पूर्व-मोसमी (15 ते 20 मे नंतरचा) व सध्याच्या (मार्च-एप्रिल मधील) होणाऱ्या अवकाळी पावसात साध्यर्मता दिसत आहे. मात्र, त्यांचे स्वरूप त्या पाठीमागील वातावरणीय प्रणाली कारणेही पूर्णपणे वेगळी असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात उष्णतेची काहिली वाटत असली तरी सदर तापमान सरासरीइतकेच जाणवत आहे.