राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काल उधाण आले होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी, “या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही”, अशी स्पष्टोक्ती दिली. दरम्यान, यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्मिल टीप्पणी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलाताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
मला वाटतं अजून तिथी जवळ आलेली नाही. गुणही जुळत नाही. त्यामुळे कोणती पुजा करावी लागले, हे एखाद्या ब्राम्हणाला विचारायला लागेल. पण वेळ येईल काळजी करू नका, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच अजित पवारांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त खरंच आहे का? असं विचारलं असता, ही वेळी लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे. पण गुण जुळत नसल्याचं ब्राम्हणाचं म्हणणं आहे, अशी मिश्कील टीप्पणीही त्यांनी केली.
दरम्यान, काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याच्या चर्चांना स्वतः अजित पवार यांनीच काल माध्यमांसमोर येत पूर्णविराम दिला. ते म्हणाले की, मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या काही सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण केला जात आहे. ज्या बातम्या दाखविल्या जात आहेत, त्यात काहीच तथ्य नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
