राज्यातील वीस हजार गावांचे संपूर्ण परिवर्तन करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपण मुख्यमंत्री असताना कॉर्पोरेट्सच्या मदतीने राज्यातील एक हजार गावांचे आदर्श गाव म्हणून परिवर्तन केले असल्याचे सांगून आगामी काळात राज्यातील २० हजार गावांचे सर्वंकष परिवर्तन करण्याचा शासन विचार करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यात कॉर्पोरेट व उद्योग समूहांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचे सांगून सीएसआर अंतर्गत कोणतेही उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी शासन कॉर्पोरेट्स व उद्योग समूहांना निश्चितपणे मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.नवभारत वृत्तपत्र स्थापनेच्या ९० व्या वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते यावेळी नवभारत वृत्तपत्राच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच एका कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. निमिष माहेश्वरी यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदित्य बिर्ला शिक्षण न्यासाच्या अध्यक्ष डॉ नीरजा बिर्ला, गोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष नादिर गोदरेज, बजाज फाउंडेशनचे अपूर्व बजाज, रायन समूहाच्या अध्यक्ष ग्रेस पिंटो, श्रेया घोडावत, रुबी हॉल क्लिनिकचे परवेझ ग्रांट, वाडिया हॉस्पिटलच्या मिनी बोधनवाला यांसह ५५ उद्योग, शिक्षण व व्यवसाय प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले.