आयपीएलमध्ये सनराजयर्स हैदराबादसमोर धोनीच्या चेन्नई संघाचे आव्हान आहे. दन्ही संघामध्ये आज काटें की टक्कर होण्याची शक्यता आहे. चेन्नईतील ‘एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक’ मध्ये लढत रंगणार आहे. चेपॉकची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत देणारी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा दबदबा दिसू शकतो. त्यामुळे दोन्ही संघाच्या प्लेईंग ११ मध्येही बदल दिसण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यांमध्ये चेन्नईने 2 सामने गमावले असून 3 सामने जिंकले आहेत. राजस्थान आणि लखनऊपेक्षा 6 गुणांनी चेन्नई गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने हा सामना अधिक फरकाने जिंकल्यास ते 8 गुणांसह पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. संघातील ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे आणि तुषार देशपांडे यांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे.
सनरायझर्स हैदराबादने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. पंजाबविरुद्ध पहिला आणि कोलकाताविरुद्ध दुसरा विजय मिळवला. त्याचवेळी राजस्थान, लखनऊ आणि मुंबईविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या मोसमात हैदराबादला मोठी भागीदारी करण्यात अपयश येत आहे.
अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिष थिक्षाना, आकाश सिंग.
सनरायझर्स हैदराबाद
हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मॉर्कर्म (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), अब्दुल समद, मार्को जेन्सन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन
