आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ची रिलीज डेट जाहीर; या दिवशी येणार ‘ड्रीम गर्ल’

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत ‘ड्रीम गर्ल’ या सिनेमाचा समावेश आहे. त्याचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता ‘ड्रीम गर्ल 2’ या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.

आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट २०१९ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. आयुष्मान खुरानाने साकारलेली ‘पूजा’ची व्यक्तिरेखा खूप गाजली. आता आयुष्मान ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत ‘ड्रीम गर्ल २’ची घोषणा केली. तर तो वेळोवेळी या चित्रपटाबद्दलचे अपडेट्सच्या त्यांची शेअर करत होता. प्रेक्षकही या चित्रपटाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता अशा तस निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

‘ड्रीम गर्ल 2’ आता 7 जुलै ऐवजी 25 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या विलंबाचे कारण चित्रपटाच्या वीएफक्ससह कामाला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये वीएफक्स काम खूप महत्त्वाचे आहे, कारण आयुष्मान खुराना पूजा आणि करमची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट एक धमाकेदार कॉमेडी असेल जो प्रेक्षकांना प्रचंड हसवेल. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत.

‘ड्रीम गर्ल 2′ या सिनेमाबद्दल एकता कपूर म्हणाल्या,”ड्रीम गर्ल 2’ या सिनेमात पूजाची भूमिका आयुष्मानने चोख पार पाडावा अशी आमची इच्छा आहे. या सिनेमाच्या वीएफक्ससह इतर गोष्टींवर आम्ही खूप मेहनत घेत आहोत”.