आज आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध हैदराबादमध्ये रंगणार लढत

आज आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडणार आहे. गुणतालिकेचा विचार करता नवव्या स्थानी असलेल्या हैदराबादला आजचा विजय पुढील फेरीत एन्ट्रीसाठी महत्त्वाचा आहे. तर दिल्ली ही दहाव्या स्थानी असल्याने त्यांनाही स्पर्धेतील आव्हान जिंकण्यासाठी आजचा विजय मिळवणं महत्त्वाचा आहे.

आयपीएल 2023 गुणतालिकेत आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांतून दोन विजयांनंतर हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे, डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघ सहा सामन्यांपैकी एकाकी विजयासह शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. हैदराबाद संघाने मागील सामना गमावला. त्यानंतर संघाला चेन्नई सुपर किंग्जकडून सात गडी राखून पराभव पत्करावा लागला. दिल्ली संघाने अखेरच्या सामन्यात कोलकाताचा 4 गडी राखून पराभव केला.

हैदराबादमधील हवामान आज अंशतः ढगाळ राहील पण पावसाची शक्यता नाही. तापमान 29.69 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या काही सामन्यांवर नजर टाकली तर हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही अनुकूल वाटत आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावात फलंदाजी करणे सोपे दिसत आहे. मागील काही सामन्यांनुसार या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 145 धावांची आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

दिल्ली संभाव्य प्लेईंग 11
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, मुकेश कुमार.

हैदराबाद संभाव्य प्लेईंग 11
हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक