आगामी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या राजकारणात लवकरच दोन मोठे भूकंप होणार असल्याचं म्हटलं होतं. अशात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत राहणार की नाही हे अताच सांगता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गेले काही दिवस अजित पवार आपल्या वेगळ्या गटासह भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र या सर्व चर्चांवर अजित पवारांनी स्वत: माध्यमांसमोर येत पडदा टाकला आहे.
2024 च्या निवडणुका वंचित बहुजन आघाडीसोबत मविआ एकत्र लढेल का? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी म्हटलं की, “वंचितची आघाडीसोबत चर्चा झालेली नाही. जी चर्चा झाली ती फक्त कर्नाटकातल्या मर्यातीद जागांविषयी होती. दुसरी कसलीही नव्हाती, मविआ आणि वंचित बाबात शदर पवारांनी असं म्हटलं आहे.
दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार नसल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. त्यात सत्ताधाऱ्यांकडूनही वारंवार या मुद्द्यावरून टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यासंदर्भात माध्यमांनी विचरणा केली असता शरद पवारांनी सूचक विधान केलं. “आम्ही एकत्र लढणार वैगरेबद्दल बोलायचं झालं, तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलीच नाही. त्यामुळे यावर कसं सांगता येईल?” असं शरद पवार म्हणाले आहेत.
