मन कि बात ने भारतवासींवर खोल प्रभाव टाकला आहे. हे ऐतिहासिक ठरले आहे, ज्याची सुरवात आमच्या पंतप्रधानांनी केली आहे. असे उद्गार आमिर खान यांनी काढले आहे. मन की बात ची सुरवात ३ ऑक्टोबर २०१४ रोजी झाली होती. त्यानंतर प्रत्येक महिन्याला हा कार्यक्रम प्रसारित होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने दिल्ली येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यासाठी अनेक मान्यवर लोक उपस्थित होते. तसेच हिंदी सिनेसृष्टीतील काही कलाकार देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान देखील या कार्यक्रमासाठी हजर होता. त्याने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओवर होत असतो. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे समस्त देशवासियांसोबत संवाद साधतात. यावेळी ते बोलताना आपल्या देशातील अतिशय स्थानिक भागातील कर्तृत्वान लोकांची, महिलांची, खेळाडूंची उदाहरणे देत असतात. तसेच अनेक प्रेरणादायी गोष्टी ते या कार्यक्रमातून सांगत असतात.
