आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये काटें की टक्कर

बंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअवर आरसीबी आणि कोलकाता यांच्यामध्ये काटें की टक्कर होत आहे. नीतीश राणाच्या नेतृत्वातील कोलकाता संघ आठव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याला पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याला विजय गरजेचा आहे. दुसरीकडे आरसीबीचा संघ विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. त्याशिवाय ईडन गार्डन्सच्या मैदानावरील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आरसीबी आपल्या घरच्या मैदानावर उतरेल.

या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 4 सामने जिंकले आहेत. तीन पराभूत झाले आहेत. संघाचे आठ गुण आहेत. फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि डेव्हिड विली हे कोलकाताविरूद्धच्या संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय विराट कोहली, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज हे खेळाडू संघाला मजबूत करत आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 2 विजय आणि 5 पराभव स्वीकारले आहेत. संघाचे केवळ चार गुण आहेत. बंगळुरूविरुद्ध जेसन रॉय, आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि डेव्हिड व्हीजे हे चार विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय नितीश राणा, रिंकू सिंह आणि व्यंकटेश अय्यर हे खेळाडू संघाला मजबूत करत आहेत.

संभाव्य प्लेइंग-11

कोलकाता नाइट रायडर्स : जेसन रॉय, लिटन दास (विकेटकीपर), एन जगदीशन, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

रॉयल चेंलेंजर्स बेंगलोर : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेशाई, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, वानिंदु हसारंगा, मोहम्मद सिराज