दंतेवाडामध्ये नक्षलवादी हल्ला, 11 जवान शहीद

दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या भू-सुरंगस्फोटामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत. अरणपुरच्या जंगलामध्ये हा स्फोट माओवाद्यांनी केला असून अजूनही माओवादी आणि जवान यांच्यामध्ये त्या ठिकाणी चकमक सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी मदत पोहोचणे कठीण होत आहे.

माओवाद्यांनी त्यांचे एक पिकअप वाहनही उडवले आहे. काही जवान जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. सध्या तरी या प्रकरणाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यात जवानांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण जिल्ह्यातील अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.