अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार सोहळ्यामध्ये मी सहभागी होणार नाही – विवेक अग्निहोत्री

फिल्मफेअर पुरस्कार 2023 हा सोहळा लवकरच पार पडणार आहे. या पुरस्कारसाठी नामांकित झालेल्या चित्रपटांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. आताl प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर करुन फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यावर निशाणा साधला आहे. विवेक अग्निहोत्री हे फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 बॉयकॉट करणार आहेत. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार नाही, असं विवेक यांनी ट्वीट शेअर करुन चाहत्यांना सांगितलं.

बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत असलेला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा लवकरच पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला सात विभागांमध्ये नामांकन मिळाले आहेत. मात्र तरीही अग्निहोत्रींनी पुरस्कार सोहळ्यास हजर राहण्यास नकार दिला आहे. ट्विटरवर भलीमोठी पोस्ट लिहित त्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे. त्याचसोबत त्यांनी फिल्मफेअरवर भ्रष्ट आणि अनैतिक पुरस्कार सोहळा असल्याची टीका केली. ‘मला माध्यमांतून समजलं की ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला 68 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सात विभागांमध्ये नामांकन मिळालं आहे. प ण मी अत्यंत नम्रपणे या अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार सोहळ्याचा भाग होण्यास नकार देतोय’, असं अग्निहोत्रींनी स्पष्ट केलं. यासोबतच त्यांनी पोस्टमध्ये त्यामागचं कारण सविस्तरपणे सांगितलं.

विवेक अग्निहोत्री यांची पोस्ट-
‘फिल्मफेअरच्या मते, स्टार्सशिवाय कोणालाच चेहरा नसतो आणि कोणालाच महत्त्व नसतं. म्हणूनच फिल्मफेअरच्या झगमगाटात आणि अनैतिक विश्वात संजय लीला भन्साळी किंवा सूरज बडजात्या यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांना चेहरा नाही. त्यांच्यासाठी भन्साळी म्हणजे आलिया भट्टसारखे, सूरज बडजात्या म्हणजे मिस्टर बच्चन यांच्यासारके आणि अनीस बाजमी म्हणजे कार्तिक आर्यनसारखे आहेत. फिल्मफेअर अवॉर्ड्समुळेच चित्रपट निर्मात्यांना किंवा दिग्दर्शकांना प्रतिष्ठा प्राप्त होते अशातला भाग नाही. पण ही अपमानास्पद व्यवस्था संपली पाहिजे’, अशा शब्दांत त्यांनी फटकारलं.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये द कश्मीर फाइल्स, गंगूबाई काठियावाड़ी, ब्रह्मास्त्र, भूल भुलैया 2, बधाई हो 2 आणि ऊंचाई या फिल्मफेअर अवॉर्ड्सचं नामांकन मिळालेल्या चित्रपटांचे पोस्टर दिसत आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘मला मीडियाकडून कळले की, द कश्मीर फाईल्स या चित्रपटाला 68 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील 7 श्रेणींमध्ये नामांकित करण्यात आलं आहे. पण मी नम्रपणे सांगतो की, या अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार सोहळ्यामध्ये मी सहभागी होणार नाही.