भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रायगडच्या कोर्लई गावातील कथित 19 बंगल्यांच्या घोटाळ्या प्रकरणी मोठा दावा केला आहे. ठाकरे कुटुंबाविरोधातील कथित 19 बंगल्यांच्या घोटाळ्याची फाईल आता मिळाली आहे. त्यामुळे याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या अडचणी वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने 19 बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण नंतर आरोप करण्यात आल्यानंतर संबंधित बंगले जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.
रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण, आरोप करण्यात आल्यानंतर हे १९ बंगले जमीनदोस्त आले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी याबाबत तक्रार सुद्धा दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली होती.
