बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असतांनाच स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.यावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारसूतील लोकांचा गैरसमज दुर करणार. स्थानिकांच्या समंतीनेच हा प्रकल्प पुढे नेणार. जोरजबरदस्तीने हा प्रकल्प करणार नाही. ७० टक्के लोक रिफायनरी प्रकल्पाच्या बाजून आहेत. स्थानिकांनी शांतता राखावी असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला नसल्याचे सांगत आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश होता असा दावा केला आहे. बारसूत सध्या शांतता आहे. बारसूत कोणातही लाठीचार्ज केला नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश आहे. बाहेरचे काही लोक आंदोलनस्थळी आल्याची माहिती मिळाली आहे. हे सरकार सर्वसामान्याचे आहे, त्यामुळे कुठलीही जबरदस्ती केली जाणार नाही. शेतकऱ्यांशी, भूमिपुत्रांशी संवाद साधल्यावर त्यांना प्रकल्पाचे महत्व सांगितल्यावर ते स्वयंपूर्तीने सहकार्य करतील.असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
