भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली! 40 ते 50 जण दबल्याची शक्यता

भिवंडीत अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. भिवंडीतील वलपाडा येथे एक तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, इमारतीखाली 40 ते 50 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशम दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदत कार्यास सुरुवात केली आहे. इमारतीचा ढिगारा उपसला जात असून त्याखालून लोकांना काढलं जात आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. ही इमारत जुनी असल्याचं सांगितलं जात आहे.

भिवंडीत वलपाडा परिसरातील ही इमारत आहे. इमारतीच्या खालच्या भगत गोदाम होते यामध्ये 20 ते 30 जण काम करत होते. तर वरती रहिवासी होते. जीवितहानी होण्याची मोठी भीती वर्तवण्यात येत आहे. बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन विभागाला फोन करून दुर्घटनेची माहिती दिली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफची टीम, पोलिस पोहचलेत. त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केल्याचे समजते.

भिवंडतील्या कैलासनगर (वळपाडा) येथे वर्धमान कंपाउंडमध्ये आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास जी-2 ही इमारत कोसळली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर साधारण तीन ते चार कुटुंब राहत होते. खालच्या मजल्यात कामगार काम करत होते. हे सारे जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या अग्निशमन दल, एनडीआरएफच्या तुकडीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.