जैतापूर प्रकल्प होऊ नये म्हणुन उध्दव ठाकरेंनी केली 500 कोटींची डील- नारायण राणे

बारसूतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे गटाने विरोधी केला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जैतापूर प्रकल्पावरून गंभीर आरोप केला आहे. उध्दव ठाकरे यांनी वीज निर्मितीचे प्रकल्प कोकणात होऊ नयेत म्हणून 34 उद्योजकांकडून 5 कोटी ॲडव्हान्स घेतले. तर 500 कोटी रुपयाचा व्यवहार केला, असा आरोप राणे यांनी केला आहे.

नारायण राणे म्हणाले, लोक अंधारात राहिले तरी चालतील, बेकारी आली तरी चालेले, कारखाने नाही आले तरी चालेल, पण पैसा आला पाहिजे आणि दुसऱ्यांना खोके चिडवायचं. दुर्दैवानं म्हणावं लागतं यांना बाळासाहेबांचा चिरंजीव. बाळासाहेबांच्या नखाचीही सर नाही. यांना नाही कळणार राजकारण, येऊ दे कोकणात त्यांना, असं ते म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर आरोप केले.

राऊतांबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले, मी राऊतांना ऐकत नाही. ऐकण्यासारखं काय असतं त्यात? जनहिताचं कोणतं भाष्य करतात ते. शिव्या घालणं, वेगवेगळ्या नावांनी एखाद्याला डिवचणं, यापलिकडे ते काहीही करत नाहीत. त्यांच्या मनात जे होतं ते सफल झालं. पवार साहेबांनी त्यांना काम दिलं होतं शिवसेना संपवण्याचं त्यांनी ते करुन दाखवलं. संजय राऊत हा जनतेच्या हिताचा माणूस नाही. ते डिप्रेशनमध्ये आहेत.