सध्याची कोरोनाची लाट 15 मे पर्यंत ओसरणार – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

कोरोनाने दोन वर्षांपूर्वी जगभरात कहर केला होता. यातच या व्हायरसने चीन पाठोपाठ भारतात धुमाकूळ घातला होता. कोरोना रुग्णसंख्या भारतात मोठ्या प्रमाणावर फैलावत होती. यातच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले होते. दरम्यान, कोरोनाचा धोका तसा राहिलेला नाही. ही लाट डिक्लाइनिंग स्वरूपाला जात आहे. लाट ओसरत चालली आहे. येत्या 15 मे पर्यंत ही कोरोना लाट संपुष्टात येईल असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.

राज्यात मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 15 टक्के घट झाली आहे. सध्या राज्यात 5 हजार 233 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. 20 ते 26 एप्रिल दरम्यान राज्यात 5 हजार 233 कोरोना रुग्ण आढळले होते. 13 ते 19 एप्रिल दरम्यान ही संख्या 6 हजार 102 तर 6 ते 12 एप्रिल दरम्यान 5 हजार 421 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

गेल्या 2 वर्षापासून चालू असलेल्या कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. hp1v6 ही कोरोनाची लाट ओसरत असून टास्क फोर्सच्यचा माहितीनुसार, ही लाट 15 तारखेपर्यंत संपुष्टात येईल, त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही. लाट जरी संपुष्टात येत असली तर नागरिकांनी कोरोनापासून खरबदारी घ्यावी, असं आव्हान आरोग्यमंत्र्यांनी केलं.