मुंबई इंडियन्सचा आज पंजाब किंग्स विरुद्ध सामना होणार आहे. मुंबईने मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर रोमांचक विजय मिळवला होता. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी आता मुंबई इंडियन्सला प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. आज पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन काय असेल? याबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत. मुंबई इंडियन्स आजच्या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी देणार का? हा प्रश्न आहे.
पंजाब किंग्जला गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्याची संधी आहे. सध्या पंजाब 10 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. पंजाबने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यातील त्यांना 5 मध्ये विजय 4 मध्ये पराभव मिळाला आहे. यंदाच्या मोसमात मुंबईविरुद्धचा सामना पंजाबने 13 धावांनी जिंकला होता. पंजाबने चांगल्या रनरेटने विजय मिळवल्यास पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरातच्या बरोबरीचे 12 गुण होतील.
रोहित शर्मासाठी आजचा सामना खूप खास असणार आहे. कारण मुंबई इंडियन्सकडून खेळतानाचा हा रोहितचा 200 वा सामना असणार आहे. दुसरीकडे मुंबईने आतापर्यंत 8 सामने खेळले असून यामधील 4 सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवता आलाय. मुंबईचे एकूण 8 पॉईंट्स असून पॉईंट्स टेबलमध्ये ही टीम सातव्या क्रमांकावर आहे.
आयपीएलच्या या मोसमात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. दोन संघांमधील आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्यांच्या आधारे जर आपण हेड-टू-हेडबद्दल बोललो, तर दोघांमध्ये एकूण 30 सामने झाले आहेत. यापैकी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने 15 सामने जिंकले आहेत, तर पंजाबनेही एकूण 15 सामने जिंकले आहेत.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रझा, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), राहुल चहर, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग आणि कागिसो रबाडा.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, तिलक वर्मा, कॅमरून ग्रीन, पियुष चावला, अर्शद खान, ईशान किशन (यष्टीरक्षक), कुमार कार्तिकेय, जोफ्रा आर्चर आणि रिले मेरेडिथ
