प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

प्रभासचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनॉन, सनी सिंह आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

‘आदिपुरुष’चे दिग्दर्शन ओम राऊत याने केले आहे. त्याचा हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. आत्तापर्यंत ‘आदिपुरुष’ चित्रपटाशी संबंधित प्रभास, क्रिती सेनॉन आणि सनी सिंहचे अनेक पोस्टर रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये तिघेही राम, सीता आणि लक्षच्या लूकमध्ये दिसत होते. आता ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या ट्रेलरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, प्रभास, कृती सेनन, सैफ अली खान, ओम राऊत आणि भूषण कुमार 9 मे 2023 रोजी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात आदिपुरुष चित्रपटाचा भव्य ट्रेलर रिलीज करतील. हा ट्रेलर अंदाजे 3 मिनिटांचा असणार आहे. आदिपुरुष चित्रपटाची टीम 8 मे रोजी हैदराबादमध्ये प्रभासच्या चाहत्यांना ट्रेलर दाखवणार आहे, असंही म्हटलं जात आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत आहेत.

प्रभासचा ‘आदिपुरुष’ आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आदिपुरुष हा चित्रपट आता 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.