काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यापासून उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

मी पंतप्रधान मोदींच्या विरोधात नाही तर, त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केली होती. पत्रकार परिषदेदरम्यान केली होती. तसेच कर्नाटक निवडणुकीतील प्रचारावरून त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

उद्धवजी हुकूमशाही प्रवृत्तीचं कोण आहे ? तुमच्या अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्रानं बघितलं आहे. तुमच्या विरोधात टीका केली म्हणून नारायण राणेजी यांना तुरुंगात टाकलं, त्याला हुकूमशाही म्हणतात. कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करणं, याला हुकूमशाही म्हणतात. तुमच्या विरोधात बोललं म्हणून पत्रकाराला घरातून अटक करणं याला हुकूमशाही म्हणतात. विरोधात भूमिका घेतली म्हणून अभिनेत्रीचं घर तोडणं याला हुकूमशाही म्हणतात. त्यामुळे मोदीजींना हुकूमशाही प्रवृत्तीचं म्हणण्याआधी थोडा आपला सत्तेचा कार्यकाळ आठवा, अशा शब्दांमध्ये बावनकुळेंना ठाकरेंना सुनावले आहे.

पुढे बोलताना ‘जय बजरंगबली‘ या नाऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. आम्हाला ‘जय श्रीराम‘ आणि ‘जय बजरंगबली‘चा जयघोष करण्याचा अभिमान आहे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यापासून उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवाला ते साधं ट्वीटही करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना ‘जय बजरंगबली‘चा नारा दिल्यावर दुःख वाटणं साहजिकच आहे. कारण ते आता जनाब ठाकरेंच्या भूमिकेत आहात, असे ते म्हणाले.

तसेच रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवाला तुम्ही साधं ट्विट करू शकला नाहीत. त्यामुळे तुम्हाला ‘जय बजरंग बली‘चा नारा दिल्यावर दुःख वाटणं साहजिकच आहे. कारण तुम्ही आता जनाब ठाकरेंच्या भूमिकेत आहात, असे म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले आहे. दरम्या, आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्याला आता बावनकुळेंनी जोरदार उत्तर दिले आहे.