प्रधानमंत्री किसान सन्मान निधीप्रमाणेच राज्य सरकारदेखील ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना राबवत आहे.त्याचा पहिला हप्ता केंद्राच्या योजनेसोबतच मे महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारऐवजी चार हजार जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर होणार अंमलबजावणीसरकारकडून ही योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० रु. मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ६, ००० रु. व नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत ६००० रु. अशी एकंदरीत १२,००० रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार आहे.केंद्र सरकार पीएम किसान योजनांचा लाभ थेट हस्तांतरण (डीबीटी) माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते.त्यामुळे शेतकऱ्यांचा बँक खात्याल आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे.
ई केवायसीसाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर केवायसी करता येते.या वेबसाईट ओपन केल्यावर सुरुवातीला ई केवायसीचा पर्याय दिसतो. तिथे क्लिक करून शेतकरी आधार कार्ड नंबर नोंदवून केवायसी प्रक्रिया करू शकतात.
दरम्यान शेतकऱ्यांना केवायसी 15 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. योजनेपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी पुन्हा एकदा शासनाने वाढीव मुदत देऊ केली आहे. 1 ते 15 मे या कालावधीत पूर्तता करण्यासाठी मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेत गावपातळीवर शिबीरे, ई-केवायसीसाठी सामाईक सुविधा तर आधार संलग्नीकरणासाठी टपाल खात्यात सुविधा करण्यात आली आहे. प्रलंबित ई केवायसी आणि आधार संलग्न न झालेल्या लाभार्थ्यांची यादी तयार केली जाणार असून या प्रत्येकाशी संपर्क केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
