जम्मू-काश्मीरमध्ये शोध मोहिमेदरम्यान आयईडी स्फोट; दोन जवान शहीद, 1 अधिकाऱ्यासह 4 जखमी

जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील कंडी भागात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या घटनेबाबत लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांतील ही तिसरी चकमक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही चकमक राजौरीतील कंडी भागात सुरु असून, त्यात दोन-तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे.जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी वेळोवेळी शोध मोहीम राबवत आहेत.

अशीच एक शोध मोहीम राजौरी येथे सुरू आहे.जम्मू काश्मिर मध्ये लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान, संयुक्त पथके संशयित ठिकाणी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोन जवान शहीद झाले असून एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत.

जवळपासच्या भागातून अतिरिक्त पथके चकमकीच्या ठिकाणी रवाना करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, २ जवान शहीद झाले आहेत, तर ४ जखमी झाले आहेत. जखमींना हेलिकॉप्टरने उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. यादरम्यान २ दहशतवादी ठार झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. राजौरीमध्ये सध्या इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.