राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या निवड समितीच्या निर्णयावर अजित पवार नाराज?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ मे रोजी लोक माझे सांगाती आत्मचरित्रातील कार्यक्रमात शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तब्बल नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना .एकप्रकारे धक्काच दिला त्यांना नंतर कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी शरद पवारांना विनंती केली पवारांनी राजीनामा मागे न घेतल्यानं त्यांच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. मात्र, अजित पवार यांनी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिल्याचं दिसून आलं होतं.

शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कमिटीची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राहावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आणि पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा, निवड समितीने एकमताने पवारांचा राजीनामा नामंजूर केला आहे.

शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फक्त अजित पवार त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे दिसून आलं होतं. अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितलं.पण अजित पवारांचा प्रयत्न निष्फळ ठरला आज पत्रकारांना बोलताच अजित पवार बैठक स्थळावरून निघून गेले.