सीमेपलीकडील दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात आला पाहिजे – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बैठकीत बिलावल भुट्टो यांची भेट घेतल्यानंतर 10 मिनिटांत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, दहशतवाद हा जगासाठी मोठा धोका आहे. हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय होऊ शकत नाही.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्याशी हस्तांदोलन न करता लांबूनच त्यांना नमस्कार केला. यावेळी त्यांनी बैठकीला संबोधित करताना दहशतवादाचा मुद्दा उचलून धरला. सीमेपलीकडील दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात आला पाहिजे. त्यांना होणारा निधी पुरवठा रोखला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला थेट नाव न घेता फटकारले.संपूर्ण जग जेव्हा कोरोनाशी लढत होता. प्रत्येक देशात कोरोनानं मृत्यू होत होते. त्यावेळीही दहशतवादी कारवाया सुरूच होत्या, असेही ते म्हणाले.

या बैठकीला पाकिस्तान व्यतिरिक्त चीन, रशियासह सर्व सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले आहेत. त्याच वेळी, गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. भारताची पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही.