काँग्रेस मुस्लिमांचं आरक्षण ४ टक्क्यांवरून ६ टक्के कसं करणार? काँगेस कुणाचं आरक्षण कमी करणार? ओबीसी कि लिंगायत?-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला तिखट प्रश्न विचारले आहेत. यासोबतच कर्नाटकमध्ये भाजपचा दणदणीत विजय होईल असा दावा अमित शाह यांनी केला आहे. कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात शाह म्हणाले की, भारतीय जनता पक्षासाठी सर्वच क्षेत्रांत चांगला प्रतिसाद मिळत आहेत. यावेळी कर्नाटकात भाजप पूर्ण बहुमताने येत आहे. काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, काँग्रेसने असे राजकारण करू नये. कर्नाटकची जनता काँग्रेसला उत्तर देईल.

अमित शाह यांनी सोमवारी 8 मे वृत्तसंस्था एएनआयशी संवाद साधताना सांगितले की, जर काँग्रेसने मुस्लिम आरक्षण 6% पर्यंत वाढवले ​​तर कोणाचं कमी होईल.ओबीसींचं कमी करणार की लिंगायत समुदायचं कमी करणार का? ही मोहीम संपण्यापूर्वी काँग्रेसला याबाबत सांगितले पाहिजे. आमच्या पक्षाने 4% मुस्लिम आरक्षण रद्द केले कारण ते घटनाबाह्य होते. आपल्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही. काँग्रेसने तुष्टीकरणाच्या धोरणाखाली मुस्लिम आरक्षण दिले होते, ते आम्ही काढून टाकले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढं बोलताना म्हणाले की, आरक्षण आता खूपच आम्ही विचारपूर्वक केले आहे. अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये आम्ही काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. त्या मर्यादा काँग्रेसला काढायच्या आहे, पण मला स्पष्ट करायचे आहे की एस सी आरक्षण हटवले जाणार नाही.ते म्हणाले की, आम्ही कर्नाटकातील सर्व भागांना भेटी दिल्या असून राज्यात डबल इंजिन सरकारची उत्सुकता आम्हाला दिसून येते. कर्नाटकात प्रधानमंत्री मोदींची लोकप्रियता अफाट आहे आणि ती थेट मतांमध्ये रूपांतरित होईल, भाजप कर्नाटकात प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, काँग्रेसने जेव्हा-जेव्हा मोदींविरोधात विषारी भाषा वापरली आहे, तेव्हा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. सिद्धरामय्या यांनी केवळ 19 शेतकर्‍यांची नावे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पाठवली होती, मात्र बसवराज यांचे सरकार आल्यावर त्यांनी 54 लाख शेतकर्‍यांची नावे पाठवली आणि 54 लाख कोटी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर तुमचा विश्वास वाढला आहे