अनिल परब यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. साई रिसॉर्टप्रकरणी त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. याचे कारण ईडीच्या वतीने विशेष पीएमएले कोर्टामध्ये अनिल परब यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

ईडीने या प्रकरणात तपास सुरू केला असून परब यांच्यावर मनी लॉण्डरिंगचे आरोप केले आहेत. तसेच याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्यावर कारवाई केली आहे. अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयानं 12 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे. आरोपपत्रात या तिघांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे असे कळते. मंगळवारी यावर सुनावणी होणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जाहीरपणे परब यांच्यावर या प्रकरणात आरोप केले आहेत.

या रिसॉर्टवर केंद्र सरकारच्या पर्यावर मंत्रालयानेदेखील कारवाई केली आहे. अनिल परब यांनी कायम माझा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे वारंवार जाहीर केले आहे. तरी देखील ईडीने त्यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावले आहे.