महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार स्थिर आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. 2024 च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
उद्याच्या निकालसंदर्भात बोलतना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही आशावादी आहोत, कारण आमची केस मजबूत आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे गांभीर्याने पाहिलं पाहीजे , त्याबद्दल अंदाज लावणं योग्य नाही. पण आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वीच राजीनामा देण्याच्या शक्यतेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा जास्त काही बोलू शकणार नाही. एकनाथ शिंदे राजीनामा कशाकरिता देतील. त्यांनी काय चूक केली आहे? एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. मी तुम्हाला दाव्याने सांगतो की पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढू. सरकार एकदम स्थिर आहे.
सत्ता संघर्षाच्या सुनावणीचं थेट प्रक्षेपण उद्या होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या यूट्यूब चॅनेलवरून थेट प्रक्षेपण होणार होणार आहे. सर्वोच्च न्यायलयातील कामकाज माध्यमांना थेट प्रक्षेपण दाखवता येणार आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून थेट प्रक्षेपण सुरू होणार आहेत. दिल्ली सरकारविरुद्ध उपराज्यपाल खटला आणि महाराष्ट्र सत्ता संघर्ष खटला हे दोन्ही निकाल उद्या सुप्रीम कोर्ट देणार असल्याची माहिती आहे.
