महाराष्ट्राच्या सत्ताकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वाचा निकाल देणार आहे. हा निकाल ऐतिहासिक असाच असणार आहे. या निकालामुळे राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार राहणार की नाही? याचा फैसला होणार आहे. या शिवाय त्या 16 आमदारांची आमदारकी राहणार की जाणार? याचाही फैसला आजच होणार आहे. त्यामुळे या आमदारांची धाकधूक वाढली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधी हा निकाल येणार आहे. 1973 सालच्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणे आजचा निकाल हा एक लँडमार्क जजमेंट असण्याची शक्यता आहे.
दरम्यान यावर घटनातज्ज्ञांनी आपली मत व्यक्त केली आहेत. यामध्ये उल्हास बापट यांनी सांगितले की, ‘बहुमतासाठी सत्र बोलावलं होत. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने हे रद्द केलं तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतात. याला ‘स्टेटस को अॅंटी’ काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने तसं केलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे बाहेर पडलेले पहिले सोळा आमदार घटनेनुसार अपात्र ठरतील कारण पक्षातून बाहेर पडताना तुमचं संख्याबळ हे दोन तृतीयांश हवं किंवा तुम्ही दुसऱ्या पक्षात विलीन व्हाव लागत. तर त्यांचं सदस्यत्व वाचत.’
अपात्रतेची टांगती तलवार
एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदीपान भुमरे,तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, लता सोनवणे, बालाजी कल्याणकर यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, अनिल बाबर, बालाजी किणीकर,महेश शिंदे, चिमणराव पाटील,रमेश बोरनारे-पाटील, संजय रायमुलकर
