कोर्टाच्या निकालावर समाधानी, सरकार जाणार म्हणणाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. याचवेळी कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वाचा निर्णय दिला. त्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोर्टाच्या निर्णयावर आम्ही समाधानी असल्याचे फडणवीस म्हणाले. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आम्ही सविस्तर बोलू असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आज सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सत्तासंघर्षाबाबत महत्वाची निरक्षणे नोंदवली आहेत. यामध्ये सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मात्र, सध्या तरी शिंदे-फडणवीस सरकार बचावले आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावण्यात आला आहे.

जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणून उड्या मारत होते त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या किती थोतांड होत्या हेही दिसून आलं आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.