एवढीच खुमखुमी असेल तर ठाकरे गटाच्या आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावं; श्रीकांत शिंदेंचं आवाहन

शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टचा निकाल कसा त्यांच्या बाजूने आला आहे असं जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे खासदार श्रीकांत शिंदे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी कोर्टाकडे केलेल्या 6 प्रकरणांना कोर्टानं फेटाळून लावल्याचं शिंदे यांनी म्हटलंय.प्रत्येकजण स्वत:च्या सोयीचे पार्ट सुप्रीम कोर्टाच्या निकालातून काढून सांगतायत, असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घाबरून राजीनामा दिला आणि आता मात्र नैतिकतेचा आधार घेतल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

श्रीकांत शिंदे म्हणालेत एवढी नैतिकता-नैतिकता म्हणत आहात. तुम्हाला नैतिकतेची इतकी चिड आणि खुमखुमी असेल, तर ठाकरे गटाच्या चौदा-पंधरा आमदारांनी राजीनामा द्यावा. निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे ते मुंबईत बोलत होते.

कशा पध्द्तीने लोकांची दिशाभूल सुरू आहे हे श्रीकांत शिंदे सांगत होते उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला श्रीकांत शिंदे, संजय शिरसाट, उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.श्रीकांत शिंदे म्हणाले की, ठाकरे गट लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. कोर्टाने फक्त दोन प्रकरणांवर टिपण्णी केली. चार प्रकरण फेटाळले. मला वाटते यांना निवडणुकीची खूप घाई झालेली आहे. यांना नैतिकतेची एवढी खुमखुमी असेल, तर भाजप-शिवसेनेच्या मतावर निवडून आलेल्या ठाकरे गटाच्या चौदा-पंधरा आमदारांनी अगोदर राजीनामा द्यावा. निवडणुकीला पुढे जावे. तुम्हाला कोण थांबवत आहे, असे आव्हान त्यांनी दिले.

ठाकरे गटाचे अनेक जण आमच्या संपर्कात श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटाचे खूप लोक आमच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला कळेलच. ते आजच सांगितले, तर येणारे सरप्राइज कसले, असे हसत-हसत एका प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.मिठाला जागणे म्हणजे संजय शिरसाट म्हणाले की, ज्याच्याकडून घेतले, त्याच्या मिठाला जागणे, यालाच नैतिकता म्हणतात. तुमच्यामध्ये नैतिकता असती, तर आमचा सावंत नावाचा सहकारी बांद्र्यात कॅन्सरने मेला. तुमच्यापासून दहा मिनिटांच्या अंतरावर तो हॉस्पिटलमध्ये होता. तुम्ही कितीदा त्यांना जाऊन भेटलात. तुम्ही यामिनी जाधव यांना भेटायला किती वेळा गेलात, असा सवाल त्यांनी केला.