सीबीएसईच्या इयत्ता 10 वीच्या निकालातही मुलींनीच मारली बाजी

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा परीक्षांचा निकाल आता लागला असून त्यांची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईनं 12 वी नंतर 10 वी चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल उमंग ॲप, SMS, IVRS (इंटरॲक्टिव्ह वॉईस रिस्पॉन्स सिस्टम) आणि अधिकृत वेबसाईट cbse.gov.in, results.nic.in, results.digilocker.gov.in आणि umang.gov.in वर पाहता येणार आहे.

यावर्षी एकूण 93.12 टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. 10 वीच्या निकालात त्रिवेंद्रम जिल्हा अव्वल राहिला. तर दुसरीकडे 12 वीचा 87.33 टक्के निकाल लागला. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी 92.17 टक्के निकाल लागला होता.

मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. 94.25 टक्के मुली, तर 92.72 टक्के मुले यशस्वी झाली आहेत. त्रिवेंद्रम प्रदेश 99.91 उत्तीर्णतेसह अव्वल ठरला आहे. बंगळुरू 99.18% सह दुसऱ्या, 99.14% सह चेन्नई तिसऱ्या, 97.27% सह अजमेर चौथ्या आणि 96.92% सह पुणे पाचव्या स्थानावर आहे.

सीबीएसईने विद्यार्थ्यांमधील अनहेल्थी स्पर्धा कमी करण्यासाठी इयत्ता 12 वीप्रमाणे इयत्ता 10 वीतीलही टॉपर्स आणि मेरीट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सीबीएसई आपल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी प्रथम, द्वितीय किंवा तृतीय मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावेही जाहीर करणार नाही. तसे सर्व विषयांमधील ज्या विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या केवळ 0.1 टक्के विद्यार्थ्यांनाच सीबीएसई इयत्ता 10 ची मेरिट लिस्ट देणार आहे.