संजय राऊत यांच्यासारख्या भाडोत्री माणसावर काय बोलणार? – राधाकृष्ण विखे पाटील

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्नाटक निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका करत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पात्रतेपेक्षा जास्त बोलू नये. संजय राऊत यांच्यावर काय बोलायचं? त्याचबरोबर भडोत्री माणसावर काय बोलणार.”सीमावर्ती भागातील प्रश्नांसंबंधी भाजपची काय भूमिका आहे? या प्रश्नावर विखे पाटील बोललेत. सीमा प्रश्न सोडवण्याची भूमिका भाजपची आहे. विरोधीपक्षाने यावर राजकारण केलं.

सीमा भागात देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतल्या. सीमा भागातील नागरिकांचा भाजपावर विश्वास आहे. सीमाप्रश्नी तोडगा काढण्याचीच आमची भूमिका आहे, असं विखे पाटील म्हणालेत.वाळू माफियांच्या मुजोरीवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.वाळू माफियांचा मोडकळीस काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही जो धोरण वाळू संदर्भात घेतले आहे ते यशस्वी होईल. थोडा वेळ लागेल पण आम्ही यशस्वी ठरू. काही ठिकाणी याला वाळू माफिया अडचणी आणत आहेत. एक महिन्या भरात प्रत्येकांना वाळू 600 रुपयात मिळेल, असंही विखे पाटील म्हणाले.